Double Fold आणि 16 GB RAM, Samsung चा W22 5G फोन लॉन्च

Double Fold, 16 जीबी RAM आणि 512 जीबी RAM असलेला  Samsung चा W22 5G फोन लॉन्च झाला आहे. चीनच्या ग्राहकांना समोर ठेवून हा फोन बनवण्याअत आला आहे. या फोनमध्ये 5 G असून इतरही जबरदस्त फीचर देण्यात आले आहेत.

Samsung W22 5G चे फीचर

Samsung W22 5G फोनमध्ये ऑक्टा कोर प्रोसेसर असून 16 जीबीचा RAM देण्यात आला आहे. तसेच 512 इंटर्नल मेमरी देण्यात आली असून 7.6 इंचाचा फोल्डेबल एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. फोटो आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला असून फ्रंट कॅमेरा 10 मेगापिक्सल देण्यात आला आहे. कव्हर डिस्प्लेवर 4 मेगापिक्सलचा अंडर डिस्प्ले कॅमेरा देण्यात आला आहे.

हा फोन सध्या चीनमध्ये लॉन्च झाला असून त्याची किंमत 16 हजार 999 युआन इतकी आहे. हिंदुस्थानी रुपयांत या फोनची किंमत 1 लाख 98 हजार 800 रुपये इतकी होते.