भाववाढ आणि कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी संगमनेर, अकोलेमध्ये दुकानांची तपासणी

615

कृत्रिम भाववाढ आणि कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये म्हणून संगमनेर, अकोले मध्ये दुकानांची तपासणी सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र शासनाने कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू केलेली असली तरी या मधून जीवनावश्यक वस्तूंना वगळले आहे.
जीवनावश्यक वस्तूंचे विक्री व वितरण सुरळीत राहावे याकरिता प्रशासन सर्व प्रयत्न करीत आहेत. परंतु काही अपप्रवृत्तीचे व्यक्ती अशा वेळी गैरफायदा घेऊन कृत्रिम भाववाढ व कृत्रिम टंचाई निर्माण करीत असल्याचे तक्रारी प्राप्त झाल्याने आज पासून संगमनेर आणि अकोले तालुक्यातील किराणा दुकान तसेच जीवनावश्‍यक वस्तूंची विक्री करणारे व्यापाऱ्यांच्या दुकानांची तपासणी सुरू करण्यात आलेली आहे. या तपासणीमध्ये कुठेही भाव वाढ करून वस्तूची विक्री अतिरिक्त दराने करण्यात येत असल्याचे किंवा साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून आल्यास तात्काळ जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल केले जाणार आहेत. तरी सर्वसामान्य नागरिकांनी कृपया कुठेही अतिरिक्त पैसे अदा करू नये. कोणी व्यापारी भाव वाढ करून नफेखोरी करीत असल्यास तात्काळ प्रशासनाला माहिती देण्यात यावी तसेच कुठे साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्यास त्याबाबत देखील नागरिकांनी प्रशासनात माहिती द्यावी जेणेकरून संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करता येतील असे आवाहन प्रांताधिकारी शशिकांत मंगरुळे यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या