बीसीसीआयच्या समालोचकांच्या यादीतून संजय मांजरेकर बाहेर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत असलेले माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर यांना बीसीसीआयने समालोचकांच्या पॅनेलमधून बाहेर काढल्याचे वृत्त एका इंग्रजी दैनिकामधून प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आगामी काळात आयपीएल झाल्यास संजय मांजरेकर समालोचन करताना दिसणार नाहीत.

हिंदुस्थान–दक्षिण आफ्रिका यांच्यामधील धरमशाळा येथील पहिली वन डे लढत पावसामुळे रद्द करण्यात आली. यावेळी संजय मांजरेकरांची अनुपस्थिती दिसली. सुनील गावसकर, एल. शिवरामकृष्णन व मुरली कार्तिक हे तेथे उपस्थित होते. यावर बीसीसीआयच्या एका अधिकाऱयाला विचारण्यात आल्यावर ते म्हणाले, सध्या याबाबत आम्ही विचार करीत नाही, पण त्यांच्या कामाबाबत नाराजीचा सूर उमटला असून आगामी आयपीएलमध्येही ते समालोचकांच्या यादीत नसतील.