
सामना प्रतिनिधी, पिंपरी
सामाजिक जाणिवेतून रुग्णसेवा करणाऱ्या, सार्वजनिक वाचनालये चालविणाऱया कार्यकर्त्यांना समाजात स्थान नाही, मात्र ज्याच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत, चार्जशीट आहे तो नगरसेवक होतो. जे कधी ग्रामपंचायत निवडणूक लढले नाहीत, ते लाटेत संसदेत पोहोचले. लोकशाहीच्या मंदिरातील दुर्जनांच्या प्रवेशाबाबत खंत, व्यथा वाटत असली तरी त्यांना निवडून देतं कोण, असा खडा सवाल शिकसेना नेते, पुणे विभागीय संपर्क नेते खासदार संजय राऊत यांनी केला. साहित्यिकांनी, संतसाहित्यिकांनी हे रोखले पाहिजे, त्याविरोधात लेखण्या उचलल्या पाहिजेत. मतदारांनी ठरवून दुर्जनांना नाकारायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी लिहिलेल्या ‘वैभवशाली माझा मावळ लोकसभा मतदारसंघ’ या पुस्तकाचे प्रकाशन संजय राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
पुणे, पिंपरी – चिंचवडला मोठी राजकीय परंपरा आहे, वारसा आहे. चिंतामणराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ, बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे संसदपटू पुण्याने देशाला दिले.या मातीतली माणसं कला – साहित्य – नाट्य क्षेत्रातही रमतात. लेखक झालेले खासदार श्रीरंग बारणे हेदेखील या पंक्तीत जाऊन बसले आहेत, असे खासदार राऊत म्हणाले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा – डॉ.रामचंद्र देखणे
डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही मराठी माणसाच्या जीकनातली एक अर्थपूर्ण घटना ठरणार आहे. आजकर तमिळ, संस्कृत, तेलुगू , कन्नड, मल्याळम् आणि ओडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. मराठी भाषेला जेक्हा हा अभिजात दर्जा मिळेल तेक्हा मराठीची प्रतिष्ठा काढेल.


























































