मिंधे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांना मोफत साड्या वाटल्या. पण संतप्त महिलांनी या साड्यांची होळी केली आहे. संभाजीनगरच्या सिल्लोड गावात सत्तार यांनी या साड्या वाटल्या होत्या.
राज्यात आणि देशात नवरात्रीचा उत्साह आहे. याच निमित्ताने मिंधे गटाचे आमदार आणि मंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड सोयगाव मतदारसंघात साडी वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. सत्तार यांनी महिलांना साडी वाटप केले. पण या कार्यक्रमात काही महिला संतापल्या. म्हणून त्यांनी सर्व साड्या जमा केल्या आणि त्याची होळी केली. दरम्यान या घटनेचे व्हिडीओही व्हायरल झाले आहेत. सिल्लोड तालुक्यातील वांगी बुद्रुक गावात महिलांनी ही साड्यांची होळी केली आहे. सत्तार यांच्या कार्यकर्त्यांनी गावातील काही लोकांना अपशब्द वापरले होते. त्यामुळे या महिला संतप्त झाल्या. त्यामुळे या संतप्त महिलांनी या साड्या जाळल्या आहेत.