शिक्षणाचा धंदा सुरू आहे – मोहन भागवत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

‘शाळेची इमारत म्हणजे केवळ दगड विटांचे भवन नसून त्या इमारतीमध्ये समाज बांधणी करणारे, माणुसकी जपणारी माणसे तयार झाली पाहिजे. विद्येबरोबर विवेक आला पाहिजे. आज शिक्षणाचा धंदा सुरू आहे. पोटभरु शिक्षण न देता मूल्याधारित शिक्षण देणे गरजेचे आहे’, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी केले.

chikhli

चिखली येथील आदर्श विद्यालयाच्या नुतन वास्तुचा लोकार्पण सोहळा सोमावारी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण प्रसारक मंडळ चिखलीचे अध्यक्ष, रामकृष्ण दादा शेटे यांच्यासह आशीर्वाद देण्यासाठी स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वतीजी महाराज, पळसखेड सपकाळ, विद्याभारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री काशिपती यांची विशेष उपस्थिती होती.

यावेळी सरसंघचालक मोहनजी भागवत म्हणाले की, केवळ पोट भरण्यासाठी दिले जाणारे शिक्षण उपयोगाचे नाही तर शिक्षणातून सुसंस्कारी व संस्कृत माणूस घडला पाहिजे. त्यामुळे शाळेत शिक्ष्ण देतांना उत्तंम विद्यार्थी घडविणारे समाजाची बांधणी करणारे शिक्षण देणे गरजेचे आहे. विद्या-धन व शक्ती धारण करणार्‍या व्यक्तींनी यांचा उपयोग समाजहितासाठी करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मिळालेल्या यश अपयशावर अंवलंबुन न राहता सतत कार्यरत राहणे गरजेचे आहे कारण यश अपयश ही एक निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान नव्हे तर जिवनात उपयोगी पडणारे ज्ञान देणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.

सरसंघचालकाची शेटे परिवाराची कौटुंबिक भेट

चिखलीचा शेटे परिवार हा संघ स्थापनेपासून संघ कार्यात आघाडीवर आहे. आतापर्यत शेटे परिवाराने संघ परिवाराच्या अनेक जबाबदार्‍या पार पाडल्या आहेत. त्यामुळे आतापर्यंतचे सर्व सरसंघचालकांचे व शेटे परिवाराचे जिव्हाळ्याचे संबंध राहीले आहे. 45 वर्ष नगर संघचालक राहलेले स्व  जयवंतराव शेटे  गोविंदरावबाबा वेटे व चिखली शहरातील शेटे परिवार आज ही संघ कार्यासाठी वाहून घेत आहे त्यामुळे आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी प्रचारक गणेश शेटे यांचे वडील शंकरराव शेटे, मालती शंकरराव शेटे यांच्या घरी जाऊन कौटुंबिक भेट घेतली. प्रकृतीची विचारपूस करत गप्पा मारल्या. इतर परिवारीक चौकशी सुध्दा केली. यावेळी त्यांच्यासोबत मदनराव शेटे, रमाबाई शेटे,  माजी नगराध्यक्ष सुहास शेटे प्रमोद शेटे सुधीर शेटे बंडु शेटे आदी उपस्थित होते. चिखली तालुका संघचालक अरविंद असोलकर यांच्याही घरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी भेट देवुन आस्थेने चौकशी केली.