
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानंतर देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (SBI) तुमचे खाते असेल तरी ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. याबाबत स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केले आहे.
एसबीआयने आपल्या खातेधारकांना पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याचा सल्ला दिला आहे. पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक (PAN Card Aadhaar Card Link) करणे आवश्यक आहे. कोणत्याही अडथळ्यांशिवाय बँकिंग सेवेचा लाभ घ्यायचा असेल तर हे काम करणे आवश्यक असल्याचे एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.
पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2022 आहे. दिलेल्या मुदतीमध्ये खातेधारकाने हे काम केले नाही तर अशा स्थितीत पॅनकार्ड निष्क्रीय होील आणि एसबीआय खातेधारकांना बँकिंग सेवा वापरता येणार नाहीत, असेही एसबीआयने आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
दरम्यान, याआधी पॅनकार्ड आधारकार्डशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर, 2021 होती, परंतु ही तारीख 31 मार्च 2022 पर्यंत वाढवण्यात आली. त्यामुळे तुमचेही एसबीआयमध्ये खाते असेल तर पॅनकार्ड आधारशी लिंक कसे करावे हे जाणून घ्या…
1. सर्वात आधी तुम्हाला आयकर विभागाच्या (Income Tax) अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल किंवा https://www.incometaxindiaefiling.gov.in/home हे गूगलवर सर्च करून तुम्ही वेबसाईटवर जाऊ शकता.
2. वेबसाईटवर गेल्यावर डाव्या बाजूला तुम्हाला Link Aadhaar हा पर्याय दिसेल.
![]()
3. दिलेल्या पर्यायावर क्लिक केल्यावर एक नवीन पेज ओपन होईल ज्यात तुम्हाला आपला पॅनकार्ड नंबर आणि आधारकार्ड नंबर टाकायचा आहे. यानंतर आधारकार्डवरील नाव आणि मोबाईल नंबर टाकायचा.
![]()
4. जर तुमच्या आधारकार्डवर फक्त जन्मतिथी लिहिली असेल तर I have only year of birth in aadhaar हा पर्याय निवडायचा आहे. नंतर त्याखाली असणारा अॅग्री टू व्हॅलिडेट हा पर्याय निवडायचा आहे.
5. हा पर्याच निवडल्यानंतर वर दिलेली सर्व माहिती योग्य आहे की नाही याची पुन्हा पडताळणी करून घ्या आणि लिंक आधार या पर्यायवर क्लिक करा. झाले तुमचे पॅनकार्ड आधारशी लिंक.



























































