
सामना प्रतिनिधी, किल्लारी
तालुक्यातील रामेगाव येथे 2017 मध्ये बांधलेल्या 10 गाबियन बंधाऱ्यात 80 लाखांचा घोटाळा केल्याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी व तालुका कृषी साहाय्यक यांच्यावर किल्लारी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अंतर्गत गबियन बंधाऱ्याचे काम झाले पन्नास हजारात होणाऱ्या कामासाठी चाळीस पट खर्च दाखवून एक बंधाऱ्य साठी 10 लाख रुपये खर्च केले गेले. यात बहुतांश बंधारे गाळखाली दबले, काही बंधारे वर्षाच्या आताच गायब झाले. दहा गबियन बंधाऱ्याच्या कामाला 81 लाख 91 हजार रूपयांच्या गैरव्यवहारात 53 लाख 74 हजार रुपये अकुशल कामावर खर्च केल्याचे दाखवण्यात आले. पाच ते सहा मजुरांचे काम प्रत्यक्ष त चारशे चाळीस मजूर लावून केल्याचे दाखवण्यात आले आशा प्रकारे शासनाची लाखो रुपयांची फसवणूक करण्याऱ्या अधिकाऱ्याची जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दखल घेतली. या प्रकरणी समिती नेमून चौकशीचे आदेश दिले समितीचा अहवाल आल्यानंतर विभागीय आयुक्तांनी यावर कार्यवाही केली.
याप्रकरणी तालुका कृषी अधिकारी महारुद्र रामहरी मोरे यांच्या फिर्यादीवरून तालुका कृषी अधिकारी डी. व्ही. बिराजदार, कृषी सहाय्यक संतराम कसबे यांचा विरुद्ध किल्लारी पोलीस ठाण्यात गुन्हा क्र 73/19 कलम 420,409 34 भदवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास किल्लारी पोलीस करीत आहेत.




























































