शालेय पोषण आहारात १६ लाखांचा घोटाळा, मुख्याध्यापकाविरुद्ध गुन्हा दाखल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांची संख्या तिप्पट दाखवून शासनास तब्बल १६ लाखांचा गंडा घालणाऱ्या पिसादेवी रोडवरील भगवान महावीर शाळेच्या मुख्याध्यापकाविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पिसादेवी रोडवरील भगवान महावीर प्राथमिक शाळेत पाच वर्षांपासून पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शाळेत खिचडी वाटप करण्यात येते. जिल्हा परिषदेच्या वतीने शालेय पोषण आहार योजनेचा लाभ देण्यात येतो. मुख्याध्यापकाने शाळेत ४९ विद्यार्थी असताना तिप्पट विद्यार्थी संख्या दाखवून शासनाकडून १५ लाख ९५ हजार ३४३ रुपयांचे अनुदान लाटले. शालेय पोषण आहार कार्यालयाचे गटशिक्षणाधिकारी बी.ए. देशपांडे यांनी शाळेला भेट दिली असता त्यांना फक्त ४९ विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत असल्याचे आढळून आले. महावीर शाळेच्या मुख्याध्यापकाने विद्यार्थांची तिप्पट संख्या दाखवून शासनाला १६ लाखांचा गंडा घातल्याची तक्रार दिल्याने सिडको पोलीस ठाण्याच्या उपनिरीक्षक पूनम अतुल पाटील यांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.