शाळकरी मुलाचा वाढदिवसालाच आत्महत्येचा प्रयत्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 

आईने आपला हट्ट पूर्ण केला नाही, या कारणावरून पुलाची शिरोलीत शाळकरी मुलाने वाढदिवसाच्या दिवशीच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्याच्यावर सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू होते. पुलाची शिरोली येथील आठवीत शिकत असणाऱया या मुलाचा मंगळवारी वाढदिवस होता.

वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या मित्रांना घरी जेवायला बोलवायचे असा मुलाने हट्ट केला होता; पण आर्थिक परिस्थिती नसल्याने आईने मुलाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुलाचे समाधान न झाल्याने त्याने घरातील पत्र्याच्या अँगलला ओढणीने गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. आईने वेळीच गळफास सोडविल्याने अनर्थ टळला.