पुणे – कोविशील्ड लसीचे डोस सिरम इन्स्टिट्यूटमधून रवाना

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोना आजारावरील भारतातील पहिल्या वहिल्या “कोविशिल्ड” लसीचे डोस मंगळवारी पहाटे पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटमधून पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास विमानतळाकडे रवाना झाले. लसीचे डोस असलेले तीन कोल्डस्टोरेज कंटेनर रवाना झाले आहेत.

सोमवारी संध्याकाळी 6 कंटेनर इन्स्टिट्यूटमध्ये दाखल झाले होते. त्यातले पहिले तीन कंटेनर मंगळवारी पहाटे रवाना झाले आहेत. यावेळी कंटेनरमध्ये लसीचे डोस भरल्यानंतर नारळ फोडून पूजा करण्यात आली. यावेळी सिरम इन्स्टिट्यूटचे अधिकारी  कर्मचारी उपस्थित होते. कंटेनर रवाना होत असताना सिरम इन्स्टीट्यूट परिसरात पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. परिमंडळ पाचच्या उपायुक्त नम्रता पाटील या पहाटेपासून स्वतः येथे हजर होत्या. लसीचा पहिला कंटेनर ठीक चार वाजून 55 मिनिटांनी गेट क्रमांक दोनमधून बाहेर पडला. दिवसभरात एकूण 6 कंटेनर हे डोस घेऊन रवाना होणार आहेत.

मंगळवारी पहाटेच्या सुमारास तीन कंटेनरमधून विमानतळाच्या दिशेने नेण्यात आले कोविशील्ड लशीचे हे डोस देशभरातील 13 शहरांमध्ये लसीचे हे डोस पाठविण्यात येणार आहेत. यामध्ये संभाजीनगर, दिल्ली, चेन्नई, बंगळूर, कर्नाल, कोलकत्ता, विजयवाडा हैदराबाद,  गुवाहाटी, लखनऊ, चंदीगड आणि भुवनेश्वरचा समावेश आहे