
धुरंधर 2 तिकीटबारीवर चांगलाच धुमाकूळ घालत असून, या चित्रपटापुढे सर्वांचीच बोलती बंद झाली आहे. द रिव्हेंज’शी होणारा संघर्ष टाळण्यासाठी, अक्षय कुमारच्या ‘भूत बंगला’चे प्रदर्शन १७ एप्रिल पर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होण्यासही विलंब झाला असून, या चित्रपटाद्वारे अक्षय आणि प्रियदर्शन यांची पुन्हा एकदा जोडी जमली आहे.
ऋषभ शेट्टीचे ‘कांतारा चॅप्टर 1’ टीमसोबत मतभेद, इंस्टाग्रामवर काही कलाकारांना केले अनफॉलो
धुरंधर 2 या बहुचर्चित चित्रपटामुळे बॉक्स ऑफिसमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या या मोठ्या बजेटच्या ॲक्शन-स्पाय चित्रपटामुळे अनेक निर्मात्यांनी आपले चित्रपट पुढे ढकलले होते. चित्रपट 19 मार्चला प्रदर्शित झाला होता. प्रदर्शित झाल्यानंतर अजूनही हा चित्रपट चांगलाच ताबडतोड कमाई करत असल्याने, खिलाडी अक्षय कुमारचा चित्रपट भूत बंगला अखेर लांबणीवर पडला आहे.
धुरंधर 2 मुळे आलीया भट्टचा ‘अल्फा’ हा सिनेमा देखील पुढे ढकलण्यात आलेला होता. आलियाच्या जवळपास कुणी नसावे म्हणून तब्बल दोन महिन्यांनी हा चित्रपट पुढे ढकलण्यात आला आहे. हा सिनेमा आता जुलैमध्ये पुढे ढकलला गेला आहे. अदिवी शेष आणि मृणाल ठाकुरचा Dacoit: एक प्रेमकथा हा चित्रपटदेखील 19 मार्चच्या आसपास रिलीज होणार होता. मात्र ‘धुरंधर 2’ला मोठ्या प्रमाणावर स्क्रीन मिळणार असल्याने या चित्रपटाच्या निर्मात्यांनी प्रदर्शनाची तारीख बदलली. धुरंधर मुळे ‘धमाल-4’ हा चित्रपट आधी ईदच्या आसपास प्रदर्शित होणार होता. हा चित्रपट आता जुलैमध्ये प्रदर्शित होणार आहे. धुरंधर 2’ला जगभरात १०,००० पेक्षा जास्त स्क्रीन मिळाल्यामुळे, इतर चित्रपटांचे चांगलेच वांदे झाले आहेत.



























































