
सामना ऑनलाईन । बीजिंग
चीनच्या एका शहरात गर्दीने ओसांडून वाहत असलेलल्या रस्त्यावर अचानक एक कार शिरली. या कारखाली चिरडले गेल्याने 7 जणांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडल्याची माहिती एएफपी या वृत्तपत्राने दिली आहे. कार चालकाला देखील पोलिसांनी गोळी घालून ठार केलं आहे. दरम्यान, हा अपघात आहे की घातपात हे अद्याप स्प्ष्ट झालेले नाही. एएफपी या वृत्तसंस्थेने या संदर्भातील एक ओळीची माहिती ट्विटर हँडलवरून दिली आहे.
AFP news agency: Seven dead as car hits crowd in China, police shoot driver
— ANI (@ANI) March 22, 2019
हिंदुस्थानातील पुलवामा दहशतवादी हल्ला, न्यूझीलंडमधील गोळीबार या पार्श्वभूमीवर चीनमधील या घटनेप्रकरणी संशय व्यक्त केला जात आहे.




























































