कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार प्रकरणाच्या चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे सीबीआय चौकशीदरम्यान होत आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी संजय रॉय याच्यासह सात जणांची पॉलिग्राफ चाचणी आज करण्यात आली. दिल्लीहून आलेल्या विशेष सीएफएसएल टीमकडून ही चाचणी घेण्यात आली. दरम्यान सीबीआयकडून माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरजी कार मेडिकल कॉलेजमधील महिला डॉक्टरवर बलात्कार करून हत्या केल्याप्रकरणातील संशयितांची पॉलिग्राफ चाचणी घेण्यास विशेष न्यायालयाने मंजुरी दिली होती. यानंतर मुख्य आरोपी संजय रॉय यांची आज तुरुंगातच चाचणी करण्यात आली. याशिवाय माजी प्राचार्य संदीप घोष, त्या रात्री नाईट डय़ुटीवर असलेले चार कनिष्ठ डॉक्टर आणि एका स्वयंसेवकाची सीबीआय कार्यालयात पॉलिग्राफ चाचणी घेण्यात आली.