
एका सात वर्षांच्या रशियन वंशाच्या मुलावर अल्पवयीन मुलाने अत्याचार केल्याची घटना उत्तर प्रदेशातील मथुरा येथे घडली आहे. गंभीर म्हणजे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून हा अत्याचार होत असल्याची माहितीही मिळत आहे.
या मुलाच्या पालकांनी पोलिसात तक्रार केली आहे. या घटनेतील आरोपी मुलगा अवघ्या 13 वर्षांचा आहे. पीडित मुलाचे आई वडील काही वर्षांपूर्वी विभक्त झाले आहेत. सध्या पीडित मुलगा त्याच्या वडिलांसोबत राहतो.
पीडित मुलगा आणि त्याचे वडील आठवड्याच्या शेवटच्या दिवशी मथुरेतील एका आश्रमात जातात. तिथेच या आरोपी मुलाची ओळख झाली. त्याने गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यापासून तीन वेळा पीडित मुलावर बलात्कार केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे.
या प्रकरणी भारतीय दंड विधानाच्या 377 कलमान्वये तसंच पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलाची वैद्यकीय तपासणी झाली असून त्याचा जबाब नोंदवण्यात येत आहे.



























































