
पाकिस्तान आर्थिक संकटाचा सामना करतोय. दिवसागणिक पाकिस्तानची स्थिती खालावत आहे. अन्य राष्ट्रांकडे मदतीची याचना करण्याशिवाय पाकिस्तानकडे पर्याय नाही. पाकिस्तानचे वरिष्ठ अधिकारी आणि तज्ञ मंडळी ही बाब चांगलीच समजून आहेत. पाकिस्तानच्या फेडरल रेवेन्यू बोर्डाचे माजी अध्यक्ष शब्बार जैदी यांनी एका मुलाखतीत म्हटलंय की, आमचा देश आर्थिक गर्तेत सापडलाय. कारण आमच्याकडे कुणी डॉ. मनमोहन सिंग नव्हते. अर्थतज्ञ शब्बार जैदी म्हणाले, पाकिस्तानला कुणी सैनिकाने, वा कुणी जनरलने उद्ध्वस्त केलेले नाही. नोकरशहांनी उद्ध्वस्त केलेय, जे फक्त आपली नोकरी वाचवण्यासाठी हुकूमशहा आणि श्रीमंतांसाठी अल्पकालीन धोरण राबवत राहिले. मी फक्त एवढंच म्हणेन की, पाकिस्तानबाबत गंभीर नव्हते. शब्बार जैदी मे 2019 ते एप्रिल 2020 या कालावधीत पाकिस्तानच्या फेडरल रेवेन्यू बोर्डाचे अध्यक्ष होते.
























































