शाहरूख खानने स्टाफसाठी भाड्याने घेतला फ्लॅट

शाहरूख खान याच्या ‘मन्नत’ बंगल्याचे काम सुरू आहे. त्यामुळे शाहरूख आपल्या कुटुंबासह पाली हिल येथे राहायला आला आहे. या ठिकाणी शाहरुखने आपल्या कर्मचाऱयांसाठी एक फ्लॅट भाडय़ाने घेतला असून यासाठी तो दरमहिन्याला 1.35 लाख रुपये भाडे देत आहे. शाहरुखच्या अपार्टमेंटपासून 100 मीटर अंतरावर कर्मचाऱयांसाठी एक फ्लॅट भाडय़ाने घेतला आहे. हा फ्लॅट 725 चौरस फूट आहे. शाहरुख आणि गौरीने संजय किशोर रमाणी यांच्याकडून 1.35 लाख रुपयांना हा फ्लॅट भाडय़ाने घेतला आहे. या फ्लॅटसाठी 3 वर्षांचा भाडेपट्टा करार करण्यात आला आहे.