
“सत्तेचा गैरवापर कसा होता हे राऊत यांच्या पुस्तकातून समजतं. तसं लिखाण त्यांनी केलेलं आहे. ही यंत्रणा आहे ती कशी वागते याचं उत्तम लिखाण या पुस्तकात आहे”, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांच्या ‘नरकातला स्वर्ग’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना म्हणाले आहेत. प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात हा प्रकाशन सोहळा पार पडला आहे. या प्रकाशन सोहळ्याचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पटकथाकार, लेखक, कवी जावेद अख्तर होते, तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले हे प्रमुख पाहुणे या कार्यक्रमाला उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना शरद पवार म्हणाले की, “अनिल देशमुखांवर 100 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप केला. कोर्टात केस केली. त्यातला शंभरचा आकडा गेला. दोन शून्य गेली. एक कोटीचा आरोप केला, असं म्हणत सरकारने सूडभावनेतून ही कारवाई केली होती.”