मोर्चाला परवानगी दिल्यानंतर शरद पवार यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गुरुवारी बोलताना सांगितलं होतं की, लोकशाहीत मोर्चा काढण्याचा सर्वांना अधिकार आहे. तेव्हा त्यांनी परवानगीबाबत स्पष्ट संकेत दिले होते. त्यामुळे मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही. या मोर्चासंबंधी लोकांत औत्सुक्य आणि राग आहे’, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीशी बोलत होते.

देशातील महापुरुषांबद्दलची आक्षेपार्ह विधानं, कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद, बेरोजगारी यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने 17 डिसेंबर रोजी महाविराट मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे. या मोर्चासाठी आवश्यक पोलीस परवानगी मिळत नव्हती. यावरून राजकारण तापले होते.

मात्र आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोर्चाला परवानगी दिल्याचे सांगितले. यासंदर्भात शरद पवार यांनी वरील प्रतिक्रिया दिली.

पुढे ते म्हणाले की, ‘राग याच्यासाठी की छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान करण्यात आली. जबाबदार लोकांनी केलेली ही विधान सामान्य माणसांना अस्वस्थ करणारी आहेत. त्याची प्रतिक्रिया शनिवारच्या मोर्चात दिसेल’, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.