शेअर बाजाराची उसळी, ३७ हजाराकडे वाटचाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
share-market

सामना ऑनलाईन । मुंबई

आंतरराष्ट्रीय बाजाराच्या परिणामामुळे गेले काही आठवडे संथ झालेल्या शेअर बाजाराने गुरुवारी दुपारनंतर चांगली उसळी घतेली. त्यामुळे शेअर बाजारात उत्साह पाहायला मिळाला. गुरुवारी दुपारी बाजार ३२४ अंकांनी वधारून ३६५९८वर पोहोचला आहे. ही स्थिती अशीच राहिली तर शेअर बाजार ३७ हजाराचा पल्ला गाठण्याची शक्यता आहे. तर निफ्टीतही सुधारणा पाहायला मिळाली आहे. निफ्टी ८८.५५ अंकांनी वाढून ११,०३६ वर पोहोचला आहे.