
देशातील शेअर बाजारात सध्या तुफानी तेजी आहे. गेल्या तीन दिवसांपासून शेअर बाजार नवे उच्चांक स्थापन करत आहे. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक 70 हजाराजवळ पोहचला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी 21 हजाराचा टप्पा पार करण्याच्या जवळ आहे. हा बाजाराचा ऑल टाईम हाय निर्देशांक आहे. या तुफान तेजीत अनेक गुंतवणूकदारांनी जबरदस्त कमाई केली आहे.
शेअर बाजार ऑल टाईम हायवर असल्याने बाजारात कधीही मोठी घसरण दिसण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता बाजारात तेजी असताना त्याचा फायदा घ्यायचा की काही काळ वाट बघायची असा प्रश्न सामान्य गुतंवणूकदारांना पडला आहे. बाजार तेजीत असताना नेमकी कोणती काळजी घेत गुंतवणूक करायची, याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. बाजार सध्या तेजीत असण्याची अनेक कारणे आहेत. तसेच सर्व सत्रातून सकारात्मक वृत्त असल्याने बाजार तेजीत आहे.
बाजार आता ऑल टाईम हायवर आहे. त्यामुळे भावनिक किंवा इतर मुद्द्यांमुळे बाजार तेजीत असेल किंवा एखाद्या नकारात्मक वृत्तामुळे बाजारात अचानक घसरण झाली तर कमीतकमी नुकसान होईल, याची काळजी घेत गुतंवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच कोणत्याही शेअरची दीर्घकाळसाठी खरेदी करण्यासाठी गुतंवणूकदारांनी काही काळ थांबणे फायद्याचे ठरेल, असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.
- शेअर बाजार तेजीत असताना दीर्घकाळसाठी खेरदी करताना वेट अँड वॉचची भूमिका योग्य ठरणार आहे. कोणताही ट्रेड घेण्यापूर्वी योग्य अभ्यास करा आणि मगच त्यात प्रवेश करावा.
- बाजार तेजीत असताना पैसे वाढतील या लालसेने खरेदी केलेले शेअर किंवा ऑप्शन होल्ड करू नका. त्यामुळे तुमची जोखीम वाढण्याची शक्यता आहे. तसेच बाजारात कोणताही व्यवहार करताना नुकसानीचा आकडा , स्टॉप लॉस आणि रिस्क मॅनेजमेंट या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. बाजार अपेक्षित ट्रेंडच्या विरुद्ध दिशेला जात असेल तर नुकसान मर्यादीत ठेवत योग्य वेळेत व्यवहारातून बाहेर पडा.
- बाजारातील व्यवहार जोखीमेचे असल्याने गुंतवणूकदारांनी बाजार तेजीत असताना खरेदी करू नये. बाजारात घसरण असताना शेअरची किंमत कमी झाल्यावर खरेदी करावी, तसेच बाजार तेजीत असताना शएअरची किंमत वधारल्यावर त्याची विक्री करावी.
- शेअर बाजार जोखमीचा व्यवहार असल्याने यात भविष्यवाणी किंवा टिप्स अशा कोणत्याही बाबींवर विश्वास ठेऊ नये. अनेकदा बाजार तेजीत असतानाही अनेक शेअरची घसरण होत असते. तसेच बाजाराच्या तेजीची लाट ओसरल्यावर बाजार अचानक घरसतो. त्यामुळे योग्य विचार करूनच गुंतवणुकीचा निर्णय घ्यावा.
- बाजार सकारात्मक असला तरी एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी छोट्या, छोट्या रकमेची नियमित गुंतवणूक जास्त फायदा देऊ शकते. त्यामुळे जोखीम घेण्याची इच्छा नसेल तर गोल्ड बॉन्ड किंवा एसआयपीमध्ये गुंतणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
























































