Sharechat ने केली ‘मेगा स्टार’च्या तिसऱ्या पर्वाची घोषणा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मने मेगास्टारच्या तिसऱ्या पर्वाची घोषणा केली आहे. मराठीसह अन्य प्रादेषिक भाषांमध्ये व्हिडीयो तयार करणाऱ्यांसाठी ही सुवर्णसंधी असेल. बातम्या, शिक्षण, गॅजेटस अशा विविध कॅटेगरीसाठीचे व्हिडीओ या स्पर्धेत समाविष्ट करून घेता येऊ शकतील. याशिवाय छायाचित्रांचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. विजेत्यांना चार कॅटेगरीमध्ये बक्षीस दिले जाईल. या स्पर्धेचं हे तिसरं पर्व असून गेल्या पर्वात 2 लाख 20 हजारांपेक्षा जास्त लोकांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. विजेत्यांना iPhone 12, Honda Activa आणि अमेझॉनची 1,000 ते 5,000/- रुपयांपर्यंतची गिफ्ट व्हाऊचर भेटस्वरूपात दिली जाणार आहेत.