
बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने अभिनेत्री शिल्पा शेट्टी व तिचा पती राज कुंद्रा याच्याविरोधात मानसिक व शारीरिक छळाची तक्रार दाखल केली आहे. यासोबतच तिने फसवणूकीचा देखील तक्रार दाखल केला आहे.

राज कुंद्रा याला दोन महिन्यांपूर्वी पॉर्न चित्रपट बनविल्याप्रकरणी अटक झाली होती. त्यानंतर दोन महिने राज कुंद्रा तुरुंगात होता. तेव्हापासून अनेकदा शर्लिनने त्याच्यावर गंभीर आरोप केले होते. शर्लिन चोप्राने राज कुंद्रावर तिच्या घरी येऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले होते. त्यानंतर राज कुंद्राने ब्लॅकमेल करून 29 मार्च रोजी जबरदस्ती एक अश्लील फोटोशूट करायला लावले होते.
दरम्यान शिल्पा व राज यांनी शर्लिन चोप्रावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिला होता. त्यानंतर काही वेळातच शर्लिनने राज व शिल्पाविरोधात तक्रार दाखल केली.






























































