
महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आज शिवसेनेने झाडांच्या बचावासाठी ठाम भूमिका घेत तब्बल 939 झाडे वाचवली आहेत. यामध्ये पालिकेचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडच्या कामातही 497 झाडे बचावली आहेत. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी ही माहिती दिली. आजच्या बैठकीत 1006 झाडे कापण्यासाठी मांडण्यात आलेल्या 13 पैकी केवळ सात प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
महानगरपालिका क्षेत्रात कोणत्याही विकासकामांसाठी पिंवा प्रकल्पासाठी झाडे कापावी लागत असल्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी घ्यावी लागते. यानुसार वृक्ष प्राधिकणाच्या बैठकीत महानगरपालिका, शासकीय आणि खासगी क्षेत्रातील एपूण 1006 झाडे कापण्यासाठीचे प्रस्ताव आजच्या बैठकीत मांडण्यात आले. यामध्ये मंजूर करण्यात आलेल्या सात प्रस्तावात झाडे न कापता पुनर्रोपण करणे आणि झाडे वाचवण्यासाठी शिवसेनेकडून ठाम भूमिका मांडण्यात आल्याची माहिती यशवंत जाधव यांनी दिली. दरम्यान, संबंधित प्रकल्पांमध्ये येणाऱया झाडांचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे संबंधित विकासकामांचा प्रश्नही सुटला आहे.
‘कोस्टल रोड’मध्येही महत्त्वाची भूमिका
– कोस्टल रोडच्या कामातील बरोडा पॅलेस ते वरळी सी-लिंक या भागातील कामासाठी 301 झाडे कापण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले. मात्र यातील केवळ कापणे पर्याय नसलेली 10 झाडे कापण्यास मंजुरी देण्यात आली. तर 205 पुनर्रोपित करणे आणि 86 झाडे आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
– तर प्रिंन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्प या कामात येणारी एपूण 237 झाडे कापण्याचे प्रस्ताव मांडण्यात आले. यातील 31 झाडे कापण्यास मंजुरी देण्यात आली असून 127 झाडे पुनर्रोपित करणे आणि 79 झाडे आहे तशीच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. शिवसेनेमुळे शेकडो झाडे वाचली आहेत.
कापलेल्या झाडांच्या बदल्यात दुप्पट लागवड
विकासकामामध्ये असणारी 67 झाडे पर्याय नसल्याने कापण्यास मंजुरी देण्यात आली. मात्र कापण्यात येणाऱया झाडांच्या बदल्यात दुप्पट म्हणजेच 134 नव्याने लावण्यात येणार आहेत. तर एकूण 540 झाडे पुनर्रोपित करण्यात येणार असून 399 आहे तशीच ठेवण्यात येणार आहेत.




























































