
हिंदू आणि हिंदुत्व रक्षक छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवमान केला त्यावेळी तुमच्या तोंडामध्ये बूच का बसले होते? त्यावेळी हिंदूंचा आक्रोश का नाही? असा संतप्त सवाल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी हिंदू जन आक्रोश मोर्चा काढणाऱयांना केला आहे.
सकल हिंदू समाजाच्या नावाखाली मुंबईत रविवारी लव्ह जिहादच्या विरोधात हिंदू जन आक्रोश मोर्चा काढला गेला होता. त्यामध्ये भाजपचे नेते, पदाधिकारी मोठय़ा प्रमाणात होते. त्यावरुन खासदार संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. रविवारचा मोर्चा हा कुणी आणि कुणाविरोधात काढला हेच मुळात कळले नाही. ती भाजपचीच रॅली होती. पण राज्यात आणि पेंद्रात हिंदुत्ववादी सरकार असताना मोर्चाची काय गरज होती? असा सवाल त्यांनी केला. भाजपाचे महाराष्ट्र युनिट आहे त्यांनी मोदींविरोधात आक्रोश मोर्चा काढला की काय असा लोकांचा गैरसमज झाला आहे. कारण मोर्चाचे नेतृत्व भाजपाचे लोकच करत होते. फक्त त्यांनी कपडे बदलले होते, अशी टीकाही राऊत यांनी केली.
हे सरकारचे अपयश
भाजपा सांगते तशी लव्ह जिहादची प्रकरणे देशात होत असतील. धर्मांतरे होत असतील तर ते पेंद्रात गेल्या आठ वर्षांपासून सत्तेत असलेल्या हिंदुत्ववादी सरकारचे अपयश आहे, असे टीकास्त्र्ाही संजय राऊत यांनी सोडले. ते बहुधा न्याय मागण्यासाठी शिवसेना भवनासमोर अत्यंत व्यथित मनाने जमलेले दिसतात, असा चिमटाही राऊत यांनी काढला. खरा आक्रोश पहायचा असेल तर कश्मीरात जाऊन हिंदू पंडितांचा आक्रोश पहा असे आव्हानही त्यांनी दिले.


























































