‘मंदिर वही बनाएंगे’ करत किती काळ मूर्ख बनवणार आहात? उद्धव ठाकरे यांचा खणखणीत सवाल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । शिवनेरी

‘प्रत्येकवेळी निवडणुका आल्याकी राम मंदिराचा मुद्दा घेतला जातो. पण हे राम मंदिर खरंच कधी होणार आहे? की आणखी किती निवडणुका तुम्ही ‘मंदिर वही बनाएंगे’ करत मूर्ख बनवत राहणार आहात, त्याचच उत्तर मला पाहिजे आहे’, असं म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. अयोध्येला प्रभू श्रीरामांचे दर्शन घेण्याआधी तमाम हिंदूंचे आराध्य दैवत मानल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमी शिवनेरीचे दर्शन उद्धव ठाकरे यांनी घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला.

uddhav-thackeray-shivneri
फोटो: चंद्रकांत पालकर, पुणे

‘छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम हिंदूंचे आराध्य दैवत आहे. तेव्हा हिंदूंचे दैवत असलेल्या प्रभू श्रीरामांच्या जन्मभूमीत त्यांचे दर्शन घेण्यासाठी जात असताना मी येथील पवित्र माती सोबत घेऊन जात आहे. ही केवळ माती नाही तर तमाम हिंदूंच्या भावना आहेत. त्यामुळे हिंदूंच्या भावना एकवटल्याने मंदिर उभारणीच्या कार्यला वेग येईल, आणि मंदिर निर्माण होईल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अयोध्येतील कार्यक्रमासंदर्भात विचारले असता दसरा मेळाव्यात जाहीर केल्याप्रमाणे राम मंदिरात जाणे. हाच कार्यक्रम आहे. तिथल्या साधू-संतांनी आशीर्वाद घेण्यासाठी बोलावले आहे. त्यांचे आशीर्वाद मी घेईन. तिथे असलेल्या शरयू नदीची आरती करेन. त्यानंतर 25 नोव्हेंबर रोजी श्रीरामांचे दर्शन घेईन आणि मग तिथून परतेन, असं त्यांनी स्पट केलं.

आरोप करणाऱ्या विरोधकांची कुवत काय…

उद्धव ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्यांची घोषणा केल्यांनतर मिळालेला प्रतिसाद पाहून विरोधकांचे धाबेदणाणले. त्यांनी टीका, आरोप करण्यास सुरुवात केली. यावरून प्रश्न विचारला असता, आरोप करणाऱ्या विरोधकांची कुवत काय हे मला माहीत आहे, असा सणसणीत टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.