शिव वाहतूक सेना नियुक्त्या जाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
shivsena

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार शिव वाहतूक सेना पदाधिकाऱयांचा नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. शिव वाहतूक सेनेच्या सर्व पदांना यापूर्वी स्थगिती देण्यात आली होती. त्यामुळे आता शिव वाहतूक सेनेच्या नव्याने नियुक्त्या केल्या आहेत.

शिव वाहतूक सेना (ट्रक, रिक्षा, ओला, उबेर, बस, डंपर) अध्यक्षपदी मोहन गोयल, उपाध्यक्षपदी साजीद सुपारीवाला, सरचिटणीसपदी नीलेश भोसले, कोषाध्यक्षपदी विनय मोरे या नेमणुका करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून देण्यात आली.