फायर सेफ्टीच्या प्रशिक्षणाची सक्ती करा! शिवसेनेची मागणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी, मुंबई

मुंबईत लागणाऱया आगींमुळे जीवित-वित्तहानी होण्याचा धोका असल्यामुळे विद्यार्थी-शिक्षकांसह सर्व शासकीय कर्मचाऱयांना फायर सेफ्टीच्या प्रशिक्षणाची सक्ती करा, अशी मागणी शिवसेना नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी केली आहे. याबाबत त्या पालिकेच्या महासभेत ठरावाची सूचना मांडणार आहेत.

मुंबईत दररोज झपाटय़ाने वाढणारी बांधकामे, उद्योगधंदे आणि व्यापारीकरणामुळे आगीच्या दुर्घटनाही वाढल्या आहेत. त्यामुळे एखाद्या ठिकाणी आग लागल्यास अग्निशमन दल येऊन बचावकार्य सुरू होईपर्यंत संबंधित ठिकाणाच्या लोकांनी बचावासाठी तातडीने काम सुरू करण्याची गरज असते. यामुळे मोठय़ा प्रमाणात जीवित-वित्तहानी टाळता येऊ शकते.

यासाठी शाळा-कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसह शिक्षक आणि सर्व शासकीय आस्थापनांतील कर्मचाऱयांना फायर सेफ्टीचे धडे देण्याची गरज आहे. या पार्श्वभूमीवर शीतल म्हात्रे महासभेत ठरावाची सूचना मांडण्याबाबत महापौर पिं. विश्वनाथ महाडेश्वर यांना पत्र दिले आहे. ही ठरावाची सूचना महासभेत मंजूर झाल्यास संबंधितांना फायर सेफ्टीचे धडे मिळाल्याने आग लागल्याची घटना घडल्यास तातडीने बचावकार्य सुरू होण्यास मदत होणार आहे.