विरोधकांच्या शंभर पिढ्या खाली उतरल्या तरी शिवसेना संपणार नाही – संजय राऊत

29

सामना प्रतिनिधी । राजगुरूनगर

सत्तेची सूज चढल्यामुळे भाजप व्यक्तिगत सुडाचे राजकारण करीत आहे. शिवसेना आमदारांची कामे केली जात नाहीत. या पद्धतीने शिवसेना संपविण्याचा विचार भाजप करीत असला, तरी शंभर पिढ्या आल्या तरी शिवसेना संपणार नाही, असा घणाघात शिवसेना नेते, पुणे विभागीय संपर्क नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.

खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघांतील शिवसेना आणि सर्व अंगीकृत संघटनांच्या पदाधिकाऱ्यांचे मेळावे नारायणगाव, राजगुरूनगर आणि वाघोली येथे झाले. या सर्व मेळाव्यांना प्रचंड गर्दी झाली होती.

खासदार संजय राऊत म्हणाले, भाजप हा आयाराम-गयारामांचा पक्ष झाला आहे. राष्ट्रवादी आणि काँग्रेसने जे सुडाचे राजकारण केले नाही, ते व्यक्तिगत सुडाचे राजकारण सत्तेची सूज चढल्यामुळे भाजप करीत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात महिलांचा, मुलींचा अपमान करणारी बेताल वक्तव्ये भाजपमध्ये केली जात असली, तरी पुढच्या निवडणुकीत राज्यात आणि दिल्लीत भाजपचा सफाया झाल्याशिवाय राहणार नाही. पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना येत्या निवडणुकीत आपले उमेदवार वाढविणार आहे. शिवसैनिक कधीच पदे न मागता शिवसेनाप्रमुखांच्या विचारांनी काम करीत असतो. ही सत्ता तुमच्यासाठी आहे, हे बाळासाहेबांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे. स्वबळावर निवडणुका लढण्यासाठी पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेने वणवा पेटविला आहे. राज्यात शिवसेनाच सत्तेवर येईल आणि मुख्यमंत्रीही शिवसेनेचाच होईल. शिवसेना आयाराम-गयारामांची नाही, तर शिवसैनिकांच्या त्यागातून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रतिकूल परिस्थितीत उभी केलेली संघटना आहे, असे प्रतिपादनही खासदार राऊत यांनी केले.

खेड येथील मेळाव्यास आमदार सुरेश गोरे, तालुका संपर्कप्रमुख संजय डफळ, जिल्हा समन्वयक गणेश सांडभोर, तालुकाप्रमुख प्रकाश वाडेकर, उपतालुकाप्रमुख दिलीप तापकीर, महिला आघाडी संपर्कप्रमुख दीपमाला बढे, युवासेनेचे जिल्हा अधिकारी गणेश कवडे, मतदारसंघ महिला संपर्कप्रमुख विजया शिंदे, महिला जिल्हा संघटक श्रद्धा कदम, पंचायत समिती सभापती सुभद्रा शिंदे, उपसभापती भगवान पोखरकर, चाकण नगरपरिषदेचे नगराध्यक्ष शेखर घोगरे, उपनगराध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश गोरे, जिल्हा परिषद सदस्य बाबाजी काळे, तनुजा घनवट, सुदाम कराळे आदी उपस्थित होते.

वाघोली येथील मेळाव्यास शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य माउली कटके, शिरूर-हवेलीचे संपर्कप्रमुख राजेश सोनवणे, उपजिल्हाप्रमुख अनिल काशिद, हवेली तालुकाप्रमुख राजेंद्र पायगुडे, शिरूर तालुकाप्रमुख पोपट शेलार, युवासेनेचे गणेश कवडे, विपुल शितोळे, विशाल सातव, रमेश भामगर, सविता कांचन, अलका सोनवणे, विजया शिंदे, वाघोलीचे शहरप्रमुख दत्तात्रय बेंडावले, रमेश भोसले, माउली माथेफोड, राजू भोरडे, बाळासाहेब केसवड, गुलाब गायकवाड, राजू तांबे, युवराज दळवी, विठ्ठल निलख, सचिन नागवडे, रमेश चव्हाण, रहिम शेख, अप्पा कंद, नितीन जगताप, प्रकाश लोले आदी उपस्थित होते.

नारायणगाव येथील मेळाव्यास सहसंपर्कप्रमुख अविनाश रहाणे, शिवसेना जिल्हा परिषद गटनेत्या आशाताई बुचके, माजी उपजिल्हाप्रमुख सुरेश भोर, तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर खंडागळे, सुनील बाणखेले, सरपंच दत्ता गांजाळे, सरपंच योगेश पाटे, ‘विघ्नहर’चे संचालक संतोषनाना खैरे, नगराध्यक्ष श्याम पांडे, शिवसेना गटनेते व नगरसेवक दीपेश परदेशी, युवासेना जिल्हा संघटक गणेश कवडे, मंगेश काकडे, स्मिता विटे आदी उपस्थित होते.

या तिन्हीही मेळाव्यांत खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जिल्हाप्रमुख राम गावडे, आमदार सुरेश गोरे यांचीही भाषणे झाली.

आपली प्रतिक्रिया द्या