शिवसेनेचा मोर्चा धडकला जिल्हाधिकारी कार्यालयावर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राजेश देशमाने । बुलढाणा

शेतकर्‍यांच्या विविध मागण्याकरिता जिल्हा शिवसेनेच्या वतीने बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य धडक मोर्चा वाजत-गाजत, बैलबंडीवर वाळलेल्या तूर पीकांच्या नमुन्यासह शेतकरी, आसूडधारी, भजन मंडळीसह नारेबाजी करत धडकला. यावेळी जिल्हाधिकार्‍यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव यांनी केले.

शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, २०१६-१७ मधील कर्जमाफीतील वंचित शेतकर्‍यांना लाभ मिळावा, रब्बीसाठी पीक कर्ज तात्काळ मिळावे, कर्जमाफीसाठी बँकाच्या ओटीएस सवलतीचा लाभ शेतकर्‍यांना व्हावा, गतवर्षीच्या तूर, हरबर्‍याचे चुकारे शिवाय बोंडअळीच्या नुकसानीची मदत शेतकर्‍यांच्या खात्यात जमा करावीत, रब्बीसाठी जिथे सिंचनाची व्यवस्था आहे. अशा ठिकाणी पूर्ण क्षमतेने आणि दिवसा १० तास विज पुरवठा करावा, दुष्काळाची परिस्थिती भिषण असल्याने पीक विम्याचा लाभही शेतकर्‍यांना लवकरात लवकर मिळावा शिवाय ग्रामीण भागात भविष्यातील पाणी टंचाई लक्षात घेता टँकर व अन्य सुविधेसाठी नियोजन करावे, गुरांच्या चार्‍यांसाठी प्रश्न पाठोपाठ येणार आहे. त्यासंबधीही चारा छावण्या व अन्य उपाययोजना व्हाव्यात. हमीभाव खरेदी केंद्रे जिल्हाभरात सुरु करावेत, एमएसपी प्रमाणे खरेदी करावी, ती होत नसल्यास भावांतर योजना लागू करा, सक्तीची विजबील वसुली थांबवावी, दुष्काळ संपूर्ण जिल्ह्यात घोषित करावा. या मागण्यांसाठी आज खासदार प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोरुन दुपारी सव्वा वाजता शिवसेना जिंदाबाद सह शेतकर्‍यांच्या मागण्यांचे नारे देत वाजत-गाजत धडक मोर्चा प्रारंभ झाला.

हा मोर्चा शहरातील जयस्तंभ चौक, बाजारगल्ली, कारंजा चौक, जिल्हा केंद्रीय सहकारी बँक, तहसील चौ, स्टेटबँक चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात शेतकरी, शेतमजूर, शिवसेना कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर या मोर्चाचे रुपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चेकर्‍यांना संबोधित करताना
जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, युवा सेना जिल्हा प्रमुख ऋषिकेश जाधव, आमदार संजय रायमुलकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी केले आहे. शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख खासदार प्रतापराव जाधव म्हणाले संपुर्ण जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करा, संपूर्ण कर्जमाफी द्या, हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान शेतकर्‍यांना द्या, चारा छावण्या सुरू करा यासह २४ मागण्यांचा उल्लेख केला.

या मोर्चात शिवसेना आमदार डॉ. संजय रायमूलकर, आमदार डॉ. शशिकांत खेडेकर, सहसंपर्कप्रमुखद्वय दत्ता पाटील, भास्कर मोरे, जिल्हाप्रमुखद्वय जालिंधर बुधवत, शांताराम दाणे, युवासेना जिल्हा प्रमुख ऋषीकेश जाधव, माजी जि.प. अध्यक्ष प्रा. नरेंद्र खेडेकर, शिवसेना माजी जिल्हाप्रमुख धीरज लिंगाडे, उपजिल्हाप्रमुख  राजेंद्र गाडेकर, वसंतराव भोजने, संतोष लिप्ते, संजय औताडे, भोजराज पाटील, संजय गायकवाड, बाबुराव मोरे,  दीपक बोरकर, तालुका प्रमुख डॉ. मधुसुदन सावळे, दादाराव खार्डे, शिवाजी ठाकरे, कपिल खेडेकर, प्रा. बळीराम मापारी, सुरेश वाळूकार, रामदास चौथनकर, विजय साठे, संतोष डिवरे, अनिल अमलकार, रमेश पाटील, गजानन वाघ, रविंद्र झाडोकार, यांच्यासह शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होते. मोर्चाच्या यशस्वीतेसाठी शिवसेना, युवासेना, महिला आघाडी, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.