न्यायव्यवस्थेत आशेचा किरण दिसतोय, संविधान, घटनेचा आदर करत न्याय मिळण्याची आशा – संजय राऊत

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबत सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. आम्हाला न्यायव्यवस्थेत आजही आशेचा किरण दिसत आहे. न्यायदेवता आम्हाल न्याय देईल, अशी आशा आहे, असा विश्वास शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केला. तसेच आम्हाला 4 वर्षांपासून न्याय मिळथ नसल्याने न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसल्याचे दिसत आहे, अशा शब्दांत त्यांनी परखड मत व्यक्त केले.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह याबाबतची सुनावणी आहे. आम्हाला अजूनही आशेचा किरण दिसतोय. न्यायालयात आम्हाला न्याय मिळेल, अशी आशा आहे. संविधान, घटना आणि पक्षांतराबाबत जो कायदा करण्यात आला आहे त्याबाबत न्यायदेवता आम्हाल न्याय देईल, अशी आशा आजही आहे. शिवसेना गेली 4 वर्षे न्यायासाठी झगडते आहे. कायदेशीर पद्धतीने आमचा लढा सुरू आहे. मात्र, आम्हाला तारीख पे तारीख मिळते. न्याय मिळत नाही. त्यामुळे आपली न्यायव्यवस्था प्रतिष्ठा गमावून बसली आहे, असे दिसत आहे. त्यामुळे आधीचे सर्व सरन्यायाधीश जोडे खायच्या लायकीचे होते.

प्रबोधनकारांचे पुस्तक आजही अनेकांना भेट दिले जाते. त्याचे पुस्तक देणे, यात काही गैर नाही. त्यावर बंदी नाही. फक्त त्या पुस्तकात हिंदू धर्मातील ढोंगावर प्रखर भाष्य आहे. देवा, धर्माच्या नावावर कशी लूट केली जाते, जनतेला कसे फसवले जाते, यावर त्यांनी प्रकाश टाकले आहे, त्यात काहीही गैर नाही, आगामी काळात या पुस्तकाची मागणी आमखी वाढेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.