
अंधेरी (पूर्व) विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या अधिकृत उमेदवार श्रीमती ऋतुजा रमेश लटके शुक्रवारी सकाळी 11.30 वाजता गुंदवली मनपा शाळा येथे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गणेश मंदिर, मालपा डोंगरी येथून 9.30 वाजता फेरीला सुरुवात होणार आहे. या फेरीसाठी यंग फ्रेंड गणेश मंदिर मालपा डोंगरी 3, अंधेरी पूर्व येथे शुक्रवारी सकाळी 9 वाजता सर्व पदाधिकारी शिवसैनिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
श्रीमती ऋतुजा रमेश लटके उमेदवारी अर्ज दाखल करताना शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप वळसे-पाटील, मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, कॉंग्रेस नेते सुरेश शेट्टी, शिवसेना विभागप्रमुख अॅड. अनिल परब आणि शिवसेना सचिव अनिल देसाई आदि मान्यवर उपस्थित राहणार आहेत.






















































