
सामना प्रतिनिधी । बीड
जागतिक महिला दिनानिमित्त बीड जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या वतीने जिल्हासंघटक संगिता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बार्शीनाका भागात रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याच कार्यक्रमामध्ये महिलांच्या आरोग्याची तपासणीही करण्यात आली. या दोन्ही उपक्रमात मोठ्या प्रमाणावर महिलांनी सहभाग घेतला.
महिला जागतिक दिनानिमित्त महिला आघाडीच्या जिल्हासंघटक अॅड.संगिता चव्हाण यांनी शहरातील बार्शीनाका भागात महिलांच्या आरोग्य तपासणीचा उपक्रम राबवला. यावेळी रक्तदान शिबीराचेही आयोजन करण्यात आले होते. या शिबीरात महिलांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग घेतला. आशा जगताप, नगरसेवक हिराबाई उडाण यांच्या उपस्थितीमध्ये हा उपक्रम राबवण्यात आला. यावेळी बोलताना महिला जिल्हा संघटक अॅड.संगिता चव्हाण म्हणाल्या, महिला आपल्या संसाराच्या कामामध्ये व्यस्त असतात. त्यांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होते. म्हणूनच हा उपक्रम आपण राबविला आहे. महिलांनी स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. कारण महिला सुदृढ तर देश सुदृढ होईल. प्रत्येक महिला आई, बहिण, पत्नी, मुलगी या नात्यातून जात असते. महिलांनी चूल, मूल यातच अडकून न पडता सावित्रीबाई पुले, जिजाऊमाता यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपली वाटचाल करावी असे त्या म्हणाल्या. यावेळी शेख फरजाना, उपजिल्हाप्रमुख बीड, शामलताई पवार तालुकाप्रमुख, शांताताई इटकर, उपतालुकाप्रमुख, सुनिता धुमाळ शाखाप्रमुख, भागिरथी तिडके, रेखा इंगोले, मिना वाघमारे, सारीका काळे, सारीका डोंगरे, अश्विनी तिरगुड, मिना शेळके, मयुरी पतंगे आदी उपस्थित होत्या.






























































