लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमधून भाजपमध्ये दाखल झालेले माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमध्येच मोठा धक्का बसला आहे. अशोक चव्हाण समर्थक म्हणून ओळख असलेले माजी मंत्री डी. पी. सावंत यांनी कॉँग्रेससोबतच राहण्याचा निर्णय घेतला आहे. नांदेड उत्तरमधून त्यांनी विधानसभेची उमेदवारी मागितली आहे. यामुळे सावंत यांनी चव्हाण यांची साथ सोडल्याचे स्पष्ट झाले आहे.
अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डी. पी. सावंत कॉँग्रेसमध्ये फारसे सक्रिय नव्हते. लोकसभा निवडणुकीतही ते कुणाच्या बाजूने प्रचार करताना दिसले नव्हते.
दरम्यान, अशोक चव्हाण यांचे नातेवाईक भास्करराव पाटील–खतगावकर यांनी त्यांच्या स्नुषा डॉ. मीनल पाटील यांना विधानसभेत उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचे विद्यमान आमदार राजेश पवार यांचा अडसर असून तिकीट न मिळाल्यास बंडाची शक्यता आहे.