
श्रीरामपूर तालुक्यातील मातुलठाण शिवारातील गोदावरी नदी पात्रात रात्री पोकलेनच्या सहाय्याने वाळू उपसा करून वाळूचोरी करणाऱ्या ठिकाणी श्रीरामपूर पोलिसांनी छापा टाकला. पोकलेनसह 1 कोटी 83 लाख 50 हजार रुपयांच्या मुद्देमालासह 5 आरोपींना गजाआड केले. ही कारवाई सोमवारी पहाटे 3 वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
पोलिसांनी सुनीलकुमार चूरामन महतो ( वय 24 वर्ष, रा धोडा वस्ती, ता.बेरमो, जि.बोकारो, राज्य झारखण्ड. हल्ली मनजीत सिंग धुप्पड यांचेकडे रा आनंदवली नाशिक ), मनजीत सिंग धुप्पड ( रा आनंदवली, नाशिक ), अंजनी गौरीशंकर विश्वकर्मा (वय 24, रा. राजोहा, ता. बहरी, जिल्हा सिधी. मध्य प्रदेश ), युवराज सिंग केशर सिंग भंडारी (वय 40, रा. डी जी बागेसर, जि. डेहराडून ), रवी धुप्पड (रा. श्रीरामपूर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून दोन पोकलेन, एक बुलडोझर , एक ट्रक , एक मोबाईल, चार ब्रास वाळू असा एकूण 1 कोटी 83 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.अन्य एक आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे. सर्व आरोपींविरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक डॉ. दिपाली काळे, पोलीस उपअधिक्षक राहुल मदने, पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, पोलीस उपनिरीक्षक अतुल बोरसे, सहाय्यक फौजदार राजेंद्र आरोळे, सुरेश औटी, गोरे, लोंढे, गोरे, रणवरे, काका मोरे, नितीन चव्हाण, रवींद्र माळी, नितीन शिरसाठ , सुनील शिंदे आदींनी केली.





























































