नातीगोती : आम्ही समान धर्मा

2594

आपला जोडीदार पद्मा वाडकर.

लग्नाचा वाढदिवस  1 जुलै.

आठवणीतला क्षण आमचं लग्न झालेला दिवस.

त्यांचे दोन शब्दांत कौतुक खूप लाघवी स्वभावाची आणि काळजी घेणारी.

त्यांचा आवडता पदार्थ चॉकलेट्स.

एखादा त्यांच्याच हातचा पदार्थ चहा.

वैतागतात तेव्हा मी गप्प बसतो.

त्यांच्यातली कला खूप चांगलं गाते.

त्यांच्यासाठी एखादी गाण्याची ओळ तुमसे मिल के ऐसा लगा…

तुमच्या आयुष्यात त्यांचे स्थान खूप महत्त्वाचे आहे. तिने मला माझ्या दोन लेकींची अनमोल भेट दिली आहे. तिचं ऋण फेडता येणार नाही.

तुम्हाला जोडणारा भावबंध माझ्याबाबत ती फार पझेसिव्ह आहे. पण तिचं पझेसिव्ह असणं मला कुठेतरी आवडतं आणि तोच आम्हाला जोडणारा भावबंध आहे.

भूतकाळात जगायचे असल्यास कोणते दिवस जगाल ज्या वेळेला इंडस्ट्रीत आलो त्या वेळेला मी ऍड्स, जिंगल्स करायचे. त्या वेळेला लहान मुलांचेही जिंगल वगैरे असायचे. त्यावेळी पद्माही तिच्या आईसोबत गायला यायची. लहान होती. आमच्या वयात अठरा वर्षांचा फरक आहे, पण ते दिवस जगायला आवडतील. .

तुमच्यातील सारखेपणा गाणं.

कठीण प्रसंगात त्यांची साथ छाया बनते.

आयुष्यात सांगायची राहिलेली गोष्ट आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट अशी की, मी वयाने अठरा वर्षे मोठा असूनही माझ्याशी लग्नासाठी तिने होकार दिला. एवढं प्रेम करणारी, फोकस अशी मुलगी मिळाली हे माझं भाग्य आहे. माझी दैनंदिनी, काम जाणणारी आणि गाण्याची आवड असणारी मुलगी मला कदाचित शेधूनही सापडली नसती. हा देवाचा आशीर्वाद आहे, त्याने पद्मासारखी जोडीदार मला दिली. त्यासाठी पद्मा तुझे मनापासून आभार.

आपली प्रतिक्रिया द्या