
महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राने तरुणींसाठी कॉम्प्युटर उद्योगाची दारे उघडली. 25 तरुणींना सरकारच्या या दोन उपक्रमांमार्फत विनामूल्य बेसिक कॉम्प्युटर हार्डवेअरचे विनामूल्य प्रशिक्षण देण्यात आले. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्ष ज्योती ठाकरे आणि माजी आमदार सुनील शिंदे यांच्या हस्ते त्यांना प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.
कोविड संकटात लाखो नागरिकांच्या नोकऱयांकर गंडांतर आले. अनेकांचे व्यवसाय डबघाईला आले. अशा काळात तरुणींना उद्योग आणि नोकऱयांमध्ये यशस्वी पदार्पण करता यावे यासाठी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (एमसीईडी) यांच्या संयुक्त विद्यमाने तरुणींना विनामूल्य कॉम्प्युटर हार्डवेअरचे प्रशिक्षण देण्याची योजना तयार केली.
पहिल्या टप्प्यात या प्रशिक्षणात 25 युवती सहभागी झाल्या. 13 फेब्रुवारी ते 10 मार्च या कालावधीत कोविडचे सगळे नियम पाळून त्यांनी प्रशिक्षणही पूर्ण केले. आज त्यांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली. बचतगटांसाठी कार्यरत असणारी माकिम ही महिला विकासासाठीची शिखर संस्था येत्या काळात युवती सक्षमीकरणातही आघाडीवर राहील अशी ग्वाही माविम अध्यक्ष ज्योती ठाकरे यांनी दिली.
यावेळी माजी महापौर स्नेहल आंबेकर, एमसीईडीच्या स्किल मिशन अधिकारी सोनल पाटील, पनवेल लायन्स क्लबचे अध्यक्ष रिनाक्षी बौनथियल, एमसीईडीचे राज्य समन्कयक सुनील देसाई, सोनिटेक एज्युकेशनच्या सुवर्णा तोंडवलकर उपस्थित होते.

























































