8 जीबी रॅमसह Vivo X60t स्मार्टफोन लॉन्च, किंमत फक्त…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता कंपनी व्हिओ (Vivo)ने आपला नवीन स्मार्टफोन Vivo X60t लॉन्च केला आहे. हा फोन सिंगल व्हेरिएन्टमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यात 8 जीबी रॅम आणि 128 जीबी इंटरर्नल स्टोरेज देण्यात आले आहे.

फिचर्स

– 6.56 इंचाचा फुल एचडी+ सेंटर पंच-होल AMOLED डिस्प्ले (1080×2376 पिक्सल रेजॉलूशन)
– मीडियाटेक डाइमेंसिटी 1100 SoC प्रोसेसर
– 4300mAh ची बॅटरी

vivo-x60t-new

कॅमेरा

व्हिओचे फोन आपल्या कॅमेऱ्यासाठी ओळखले जातात आणि या फोनमध्ये देखील खास कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असून प्रायमरी कॅमेरा 48 मेगापिक्सलचा आहे. सोबत 13 मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर आणि 13 मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे.

अन्य वैशिष्ट्य

Vivo X60t हा फोन अॅड्रॉईड 11 बेस्ड OriginOS वर काम करतो. यात 4300 एमएएचची बॅटरी देण्यात आली असून कनेक्टीव्हिटीसाठी फोनमध्ये ड्यूल सिम, 5G, वाय-फाय 6, ब्लूटूथ 5.2, एनएफसी सारखे पर्याय देण्यात आले आहे. तसेच यात ऐक्सेलरोमीटर, ऐंबिएंट लाइट, कंपास, प्रॉक्सिमिटी, जाइरोस्कोप आणि कोल्ड टेंपरेचर सेन्सरही देण्यात आले आहे.

vivo-x60t-new-1

किंमत

व्हिओ कंपनीने हा फोन सध्या फक्त चीनमध्ये लॉन्च केला आहे. चीनमध्ये याची किंमत 3498 युआन (जवलपास 38 हजार रुपये) एवढी आहे.