कंकणाकृती सूर्यग्रहण पाहण्याची रायगडवासीयांमध्ये उत्सुकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

2019 मधले शेवटचे खंडग्रास सूर्यग्रहण गुरुवारी पाहायला मिळाले. देशाच्या अनेक भागात हे सूर्यग्रहण पाहण्याचा योग खगोलप्रेमी आणि सामान्य जनतेला घेता आला. काही भागांमध्ये असलेल्या ढगाळ वातावरणामुळे मात्र अनेकांना हे सूर्यग्रहण नीट पाहाता आले नाही. रायगडवासीयांनाही ढगाळ वातावरणामुळे हे सूर्यग्रहण दिसते आहे की नाही अशी शंका निर्माण झाली होती.मात्र ढगाळ वातावरण असले तरी जिल्ह्यातील अनेक भागात हे कंकणाकृती ग्रहण पाहण्याचा योग खगोलप्रेमी आणि नागरिकांना प्राप्त झाला.

कंकणाकृती सूर्यग्रहण हे समुद्रकिनाऱ्यावरून, खुल्या मैदानातून, गॅलरीमधून जिथून शक्य होईल तिथून पाहण्याचा नागरिकांनी प्रयत्न केला. सूर्य आणि पृथ्वीच्यामध्ये चंद्र आला तेव्हा जे कंकण तयार झाले ते पाहिल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर विलोभनीय दृश्य पाहिल्याचे समाधान दिसत होते. जिल्ह्यातील बऱ्याचशा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सूर्यग्रहण पाहण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. यासाठी विद्यार्थ्यांना विशेष चष्माचे वाटपही केले होते. कंकणाकृती सूर्यग्रहण असल्याने जिल्ह्यातील मंदिरे ग्रहण संपेपर्यत बंद ठेवण्यात आली होती.