
अडीच लाख रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या बांगडय़ा नागपूर येथील भाविक लक्ष्मण गुलाबराव रक्षक यांनी श्री विठ्ठलचरणी अर्पण केल्या. आई मीराबाई रक्षक यांनी आपल्या पश्चात माझ्या हातातील सोन्याच्या बांगडय़ा श्री विठ्ठल मंदिरास दान देण्याची इच्छा व्यक्त केली होती. सोन्याच्या बांगडय़ांचे वजन 53.5 ग्रॅम आहे.
मंदिर समितीच्या वतीने सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते लक्ष्मण रक्षक यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी सदस्य शकुंतला नडगिरे, ह.भ.प. ज्ञानेश्वर देशमुख, ऍड. माधवी निगडे, ह.भ.प. प्रकाश जवंजाळ, अतुलशास्त्री भगरे गुरुजी, ह.भ.प. शिवाजीराव मोरे, साधना भोसले, कार्यकारी अधिकारी गजानन गुरव, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड उपस्थित होते.





























































