सोनिया गांधी राज्यसभेवर बिनविरोध

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आल्या आहेत. भाजपचे चुनीलाल गरासिया आणि मदन राठोड हेही बिनविरोध निवडून गेले आहेत. लोकसभेत पाच वेळा खासदार राहिलेल्या 77 वर्षीय सोनिया गांधी यांची राज्यसभेतील ही पहिलीच वेळ आहे. इंदिरा गांधी यांच्यानंतर गांधी कुटुंबातील त्या दुसऱया राज्यसभा सदस्य आहेत.