Ind Vs Eng Test Match – पाचव्या कसोटीतील माघार कोरोनामुळेच

आयपीएलचा उर्वरित मोसम 19 सप्टेंबर-15 ऑक्टोबरमध्ये खेळवण्यात येणार आहे. याआधी हिंदुस्थानी क्रिकेटपटू फिट राहावेत, कोरोना संसर्गापासून दूर राहावेत, अन्यथा आयपीएलमधून मिळणाऱया कोटय़वधी रुपयांवर पाणी सोडावे लागेल. याच कारणामुळे हिंदुस्थान- इंग्लंड यांच्यामधील पाचवा कसोटी सामना रद्द करण्यात आला. अशी टीका चोहोबाजूंनी बीसीसीआयवर होऊ लागली.

याप्रसंगी बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी स्पष्टीकरण देताना म्हटले की, हिंदुस्थानी क्रिकेटपटूंना कोरोना संसर्गाची भीती होती. त्यामुळे या खेळाडूंनी पाचव्या कसोटीत न खेळण्याचा निर्णय घेतला. पाचव्या कसोटीतील माघार आयपीएलमुळे घेण्यात आलेली नाही. तसेच आयपीएलमुळे कसोटी मालिकाही अर्धवट सोडलेली नाहीए, असेही त्यांनी पुढे नमूद केले.

आपली प्रतिक्रिया द्या