विराटने खेळाडूंवर विश्वास ठेवत त्यांना संधी द्यावी; दादाचा सल्ला

400

हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने संघातील खेळाडूंवर विश्वास ठेवत त्यांना सातत्याने संधी देण्याची गरज आहे, असा सल्ला संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने दिला आहे. हिंदुस्थानी क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर असून तेथे दोन कसोटी समन्यांचा श्रृखंला दोन देशांमध्ये होत आहे. क्रिकेट संघ अधिक मजबूत करण्यासाठी विराटला खेळात आणि संघात सातत्य आणण्याची गरज आहे. तसेच खेळाडूंवर विश्वास ठेवत त्यांना संधी देण्याची गरजही गांगुलीने व्यक्त केली.

खेळाडूंना योग्यवेळी संधी दिल्यास त्यांचा आत्मविश्वास वाढेल आणि ते फॉर्ममध्ये येतील, त्याचा संघाला चांगला फायदा होईल असे तो म्हणाला. नवीन खेळाडूंना संधी देण्याबाबत आपण नेहमी आग्रही असतो आणि त्याबाबतचे सल्ले देत असतो असेही त्याने स्पष्ट केले. श्रेयस अय्यरसारख्या खेळाडूने एकदिवसीय सामन्यात चांगली चमक दाखवली आहे. आता त्याला सतत्याने संधी देण्याची गरज आहे. त्यामुळे त्याचा आत्मविश्वास वाढेल. संघातील अनेक खेळाडूंना आता संधी देण्याची वेळ आली आहे. विराटवर आपल्याला पूर्ण विश्वास असून तो खेळाडूंना संधी देईल, असेही गांगुलीने म्हटले आहे.

वेस्टइंडिजविरोधातील पहिल्या कसोटी सामन्यात विराटने अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाला संधी दिली आहे. मात्र, कुलदीप यादव संघाबाहेर असल्याचे आश्चर्य वाटले असे तो म्हणाला. सिडनीमध्ये सपाट खेळपट्टीवरही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात त्याने पाच गडी बाद केले होते. सध्या जडेजाही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. अश्विनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आता विराटचा निर्णय किती योग्य ठरतो, ते लवकरच कळेल असेही गांगुली म्हणाला.

आपली प्रतिक्रिया द्या