चिंचोली सोन येथे अज्ञाताने सोयाबीन गंजी जाळली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । लातूर

औसा तालुक्यातील चिंचोली सोन येथे ९ एकर क्षेत्रावरील सोयाबीन गंजीला शुक्रवारी अज्ञातांनी आग लावली. यात शेतकऱ्याचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.

चिंचोली सोन येथील शेतकरी साहेबराव धोंडिबा चव्हाण या शेतकऱ्याने साधारण 9 एकर क्षेत्रातील सोयाबीन काढून गंजी लावून ठेवली होती. रात्री 12 ते 1 च्या दरम्यान अज्ञात माथेफिरूने ही गंजी पेटवून दिली. जवळपास 100 ते 125 कट्टे सोयाबीन जाळून खाक झाले आहे. सुमारे दोन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अशा घटनांमध्ये वाढ होत आहे.