आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम

शिवसेना नेते युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार, 13 जूनला मुंबईसह राज्यभरात विविध सामाजिक तसेच लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वरळीत आदित्योत्सव

युवासेना वरळी विधानसभेच्यावतीने पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक अशा कार्यक्रमांचा भरणा असलेला आदित्योत्सव हा कार्यक्रम तीन दिवस साजरा केला जाणार आहे. युवा विभाग अधिकारी संकेत सावंत यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

 13 जून 2025 ः 1) वरळीतील गरीब गरजू रहिवाशांसाठी मोफत डायलेसिस केले जाणार आहे तर आरोग्य सेवा माहितीपत्रक शुभारंभ सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हे दोन्ही उपक्रम लायन ताराचंद बापा रुग्णालय आणि रीसर्च सेंटर, सायन यांच्या सहकार्याने होणार आहेत.

 14 जून 2025 ः 1) केईएम आणि टाटा रुग्णालय येथे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांना अल्पोपहार आणि पाणीवाटप करण्यात येणार आहे. 2) वरळी येथील सुनीता दत्ताजी नलावडे उद्यानात वृक्षारोपणाचा कार्यक्रम करण्यात येणार आहे. 3) दहावी-बारावी विज्ञान आणि वाणीज्य शाखेच्या विद्यार्थ्यांना रिलायबल बुक्सकडून इन माय पॉकेट अभ्यासक्रमांची पुस्तके वाटप केली जाणार आहेत.

 15 जून 2025 ः 1) वरळी येथील भारतनगरमध्ये श्री उमा आदिनाथ स्वामी महाराज कुडाळकर, श्री स्वामी समर्थ भक्त परिवार यांच्या वतीने स्वच्छता अभियान राबवले जाणार आहे. 2) वरळीतील गांधीनगरमध्ये सप्तबंधू क्रीडा मंडळाच्या संयोजनातून धूम्र फवारणी आणि जंतूनाशक फवारणी केली जाणार आहे. 3) वरळीतील शिव गणेश पटांगण येथे शिव गणेश प्रतिष्ठानच्या वतीने भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 4) लोअर परळ पुलाखाली तालचेकरवाडी समोर महिलांसाठी भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 शिवसेना शाखा क्रमांक 192च्यावतीने गुणगौरव सोहळा आणि विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका प्रीती पाटणकर यांनी केले. या वेळी शिवसेना नेते दिवाकर रावते, उपनेते विशाखा राऊत, विभागप्रमुख, आमदार महेश सावंत, शिवसेना सचिव साईनाथ दुर्गे, विभाग संघटक श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, युवासेना कार्यकरिणी सदस्य पवन जाधव, विधानसभा निरीक्षक यशवंत विचले, विधानसभा संघटक आरती किनरे, समन्वयक रश्मी सुर्वे, उपविभागप्रमुख सिद्धार्थ चव्हाण, पैलास पाटील, उपविभाग संघटक नीता राऊळ, युवासेना विभाग अधिकारी स्वप्नील सूर्यवंशी, शाखाप्रमुख प्रवीण नरे, शाखा संघटक रिमा पारकर, कल्पना पालयेकर, सुशांत गोजारे, रमेश सोडये उपस्थित होते.