भाडे नाकारणाऱया रिक्षा-टॅक्सीचा परवाना होणार रद्द; वाहतूक पोलीस राबवणार विशेष अभियान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाडे नाकारणाऱया मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांची आता खैर नाही. वाहतूक पोलीस पुढील आठवडय़ात विशेष अभियान राबवणार असून रिक्षा-टॅक्सीचालकाने भाडे नाकारल्यास संबंधिताचा परवाना रद्द केला जाणार आहे.

रिक्षा-टॅक्सीचालक सर्रासपणे जवळचे भाडे नाकारतात. त्यामुळे प्रवाशांची मोठी काsंडी होते. अनेकदा प्रवाशांना त्यांच्या मुजोरीचा सामना करावा लागतो. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी भाडे नाकारणाऱया रिक्षा-टॅक्सीचालकांवर परवाना रद्द करण्याची कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी विशेष अभियान राबवण्यात येणार असून त्याबाबतची माहिती आरटीओ विभागाला देण्यात आली आहे. वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी प्रवीण पडवळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत रेल्वे स्थानकांच्या आजूबाजूला रिक्षा-टॅक्सीचालकांकडून नियमांचे उलंघन केले जात असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे. तसेच क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणाऱया रिक्षा-टॅक्सीचालकांची संख्या वांद्रे पूर्व-पश्चिम, अंधेरी पश्चिम, जुहू, सांताक्रुझ, कांदिवली पूर्व आणि मानखुर्द या परिसरात जास्त असून त्यांच्यावरही कारवाई केली जाणार आहे.