मंगळावर सापडली कोळय़ाची आकृती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शास्त्रज्ञ मंगळावरील जीवसृष्टीचा शोध घेत आहेत. नासाचे पर्सेवेरन्स यान मंगळावर यशस्वीरीत्या उतरले आहे. अशातच काही रहस्यमय गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. शास्त्रज्ञांना मंगळावर कोळय़ाची (स्पायडर) आकृती सापडली आहे. ही आकृती नेमकी काय आहे, ते समजून घेण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.

मंगळावर सापडलेल्या कोळी आकृतीला अरेनिफॉर्म असे म्हणतात. कार्बन डायऑक्साइडचा बर्फ न वितळता जी वाफ तयार होते, त्यातून ही आकृती तयार होते. ती मंगळावर कशी तयार झाली याचा शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. ब्रिटन, आयर्लंडच्या संशोधकांनी सिम्युलेशन चेंबरमध्ये मंगळासारखी परिस्थिती निर्माण केली आणि मग या प्रक्रियेद्वारे असा आकार निर्माण होऊ शकतो का ते बघितले.