
कंगाल झालेला माजी टेनिसपटू बोरिस बेकर याला तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बोरिस याला ब्रिटनमधील एचएमपी हंटरकोंब तुरुंगात ठेवण्यात आले आहे. तुरुंगामध्ये तो इतर कैद्यांना क्रीडा विज्ञानाचे धडे देत आहे.
बेकरला कमी कष्टाचे काम मिळाल्याने इतर कैदी त्याच्यावर नाराज झाले आहेत. या कैद्यांच्या कुटुंबीयांनी आपली नाराजी गव्हर्नरना पत्र लिहून कळवली आहे. बराच काळ कष्ट केल्यानंतर कैद्यांना शिक्षकाचे काम मिळते. बेकरला मात्र तुरुंगात आल्याच्या अवघ्या काही आठवडय़ांतच शिक्षकाचे काम मिळाले आहे. बिम्बल्डन स्पर्धेचे तीनवेळा जेतेपद मिळवलेल्या या प्रसिद्ध टेनिसपटूला अडीच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. त्याला दिवाळखोर घोषित करण्यात आलं होतं.






















































