भरतऐवजी राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी? हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका पहिली कसोटी उद्यापासून

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी क्रिकेट मालिकेला 26 डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने रविवारी जोरदार सराव केला. या सरावात के. एस. भरतऐवजी के. एल. राहुल यष्टिरक्षणाचा सराव करताना दिसला. त्यामुळे पहिल्या कसोटीत भरतऐवजी राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी असेल, असे दिसते.

रविवारी टीम इंडियाच्या यष्टिरक्षणाच्या सराव सत्रात के.एस. भरतचा समावेश नव्हता, मात्र के. एल. राहुल यष्टीरक्षण करताना दिसला. आता पहिल्या कसोटीसाठी राहुल सराव सत्रात सामील झाल्यानंतर रोहित शर्मा पहिल्या कसोटीत राहुलकडे के. एस. भरतच्या जागी यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपवेल असे दिसते. काही काळापासून ऋषभ पंत आणि राहुलच्या दुखापतीमुळे के. एस. भरतची कसोटीत यष्टिरक्षणासाठी निवड केली जात होती.

के. एस. भरतला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेत चांगली कामगिरी करण्याची संधी होती, मात्र तो फलंदाजीत अपयशी ठरला. इशान किशनलाही संधी होती, पण तोही अपयशी ठरला. ऋद्धिमान साहा संघातून बाहेर झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाने के. एल. राहुलकडे यष्टिरक्षकाची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय.

मात्र वेगवान गोलंदाजाची निवड करणे संघ व्यवस्थापनासाठी डोकेदुखी ठरणार आहे. दरम्यान, दोन वेगवान गोलंदाजांच्या स्थानासाठी तीन गोलंदाजांमध्ये चुरस आहे. जसप्रीत बुमराह वेगवान गोलंदाजीची धुरा सांभाळणार असून त्याच्यासह मोहम्मद सिराजचे स्थान निश्चित आहे. दक्षिण आफ्रिकेतील वेगवान आणि उसळत्या खेळपट्टय़ा बघता टीम इंडिया चार वेगवान गोलंदाजांसह मैदानावर उतरण्याची शक्यता आहे. हिंदुस्थानकडे शार्दुल ठाकूर, मुकेश कुमार आणि प्रसिध कृष्णासारखे वेगवान गोलंदाज आहेत, मात्र या तिघांपैकी एकाची निवड करताना हिंदुस्थानच्या संघव्यवस्थापनाची ‘कसोटी’ लागणार आहे.

ऐतिहासिक… संस्मरणीय…

– हिंदुस्थानने आपल्या घरच्या मैदानावर सलग तिसरा कसोटी विजय मिळवला. 2014 साली म्हैसूर येथे दक्षिण आफ्रिकेचा डावाने पराभव केला होता तर गेल्या आठवडय़ात नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडचा 347 धावांनी धुक्वा उडवला होता आणि आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिलावहिला कसोटी विजय मिळविला.
– पराभूत संघाकडून दोन्ही डावात अर्धशतकी खेळी करणारी ताहिला मॅकग्रा पहिली
कसोटीपटू ठरली.
– दीप्ती शर्माने गेल्या सलग चारही कसोटीत अर्धशतकी खेळ्या केल्या आहेत. त्याआधी ऑस्ट्रेलियाच्या डेनिस एमरसनने अशी कामगिरी केली होती.
– स्मृती मानधना- शेफाली वर्मा या दोघींनी कसोटीत आठव्यांदा अर्धशतकी सलामी दिली. कसोटी इतिहासात ऑस्ट्रेलियाच्या पेटा वरको- डेनिस एमरसन आणि बेलिंडा हगेट-बेलिंडा क्लार्क या सलामीच्या जोडीनेही अशी विक्रमी भागी रचली आहे.
– रिचा घोष पदार्पणातच अर्धशतक ठोकणारी 2021 नंतरची सहावी हिंदुस्थानी कसोटीपटू ठरली. गेल्या अडीच वर्षात 11 खेळाडूंनी पदार्पण केले असून शेफाली, दिप्ती आणि स्नेह राणाने 2021 मध्ये ब्रिस्टॉल कसोटीत तर शुभा सतीश आणि जेमिमा रॉड्रिग्ज या दोघींनी गेल्या आठवडय़ात इंग्लंडविरुद्ध पदार्पणातच अर्धशतक साजरे केले होते.