
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
अवघ्या दोन महिन्यांवर आलेल्या क्रिकेट विश्वचषकापूर्वी माजी विजेत्या संघाला धक्का बसला आहे. 1996 चा विजेता संघ श्रीलंकेच्या कसोटी संघाचा कर्णधार दिमुथ करुणारत्ने याला पोलिसांनी अटक केली. दारू पिऊन गाडी चालवल्याप्रकरणी करुणारत्ने याला अटक करण्यात आला होती. अटकेनंतर काहीच तासांमध्ये त्याची जामिनावर सुटका करण्यात आली.

दक्षिण आफ्रिकेमध्ये श्रीलंकेला कसोटीमध्ये ऐतिहासिक विजय मिळवून देणाऱ्या करुणारत्ने याने दारुच्या नशेमध्ये गाडी चालवली आणि एका रिक्षाला धडक दिली असा आरोप त्याच्यावर करण्यात आला आहे. याच रिक्षाचालक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रिक्षाचालकाच्या फिर्यादीनंतर करुणारत्ने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला अटक करण्यात आली. अटकेनंतर त्याला जामिनावर सोडण्यात आले असले तरी याच आठवड्यांमध्ये त्याला न्यायालयात हजर राहावे लागण्याची शक्यता आहे.
दारुच्या नशेमध्ये गाडी चालवल्याप्रकरणी न्यायालयाने करुणारत्ने याच्यावर कारवाई केल्यास याच कारवाईच्या आधारे श्रीलंकन क्रिकेट बोर्ड त्याच्यावर निलंबनाची कारवाई करू शकते. गेल्या काही महिन्यांमध्ये श्रीलंकन क्रिकेटमधील अनेक खेळाडू वादांमध्ये अडकले आहेत. यात आणखी एका खेळाडूची भर पडल्याने विश्वचषकापूर्वी संघाला धक्का मानला जात आहे.
Sri Lanka Cricket says that they will conduct an inquiry in order to take necessary action against test captain Dimuth Karunaratne following a road accident. #Lka
— Manjula Basnayake (@BasnayakeM) March 31, 2019


























































